मनोरम बालक मंदिर
सुसंस्कार हाच जीवनाचा आधार


मनुष्याच्या आयुष्यात चांगल्या संस्कारांचे खूप महत्त्व आहे. संस्कार म्हणजे केवळ शिस्त, नम्रता , प्रामाणिकपणा असे नव्हे तर संस्कार म्हणजे विचारांची शुद्धता, आदर आणि जबाबदारीची जाणीव आणि हे सारे सुसंस्कारात सामावलेले असते.
मनोरम बालक मंदिर
६ एप्रिल १९७५ या दिवशी, केवळ ३ विद्यार्थी आणि २० रुपयांची फी घेऊन मनोरम बालक मंदिर या शाळेची सुरुवात झाली. ही सुरुवात झाली ती कुठल्याही इमारतीत नव्हे, तर प्रेमाने आणि ध्येयाने भरलेल्या मनोरमा आजींच्या घरात. शाळा चालवण्याचं संपूर्ण ओझं त्या एकट्याच सांभाळत होत्या – शिक्षण, देखभाल, आणि मुलांवर माया... सगळं एकहाती.
सुरुवातीचे दिवस खूप साधे होते. मात्र आजींचा आत्मविश्वास, मेहनत आणि शिक्षणावरील निष्ठा यामुळे शाळा हळूहळू बहरू लागली. १९९७-९८ मध्ये शाळेने एक स्वतःची स्वतंत्र जागा मिळवली. त्या टप्प्यावर ४ शिक्षिकांसह मनोरमा आजींनी नव्या इमारतीत शाळेचं कामकाज सुरू केले. याच काळात, त्यांची सून – सौ. स्मिता केतकर बाई यांनी शाळेची सूत्र हातात घेतली. मुलं लहान, जबाबदाऱ्या मोठ्या, तरीही त्यांनी घर आणि शाळा दोन्ही जबाबदारीने सांभाळली. त्यांच्या प्रभावी नेतृत्वात शाळेने शिक्षण, सुसंस्कार, आणि गुणवत्ता यामध्ये भरीव प्रगती केली.
२०२१ पर्यंत, स्मिता केतकर बाईंनी अत्यंत यशस्वी आणि तळमळीने शाळेचं कामकाज पुढे नेलं. त्यांच्या कार्यामुळे शाळा केवळ एक शिक्षण संस्था न राहता, एक कुटुंब, एक संस्कृती, आणि एक प्रेरणा बनली. यामध्ये २००५ सालापासून त्यांना रघुनाथ केतकर सरांची सक्रिय साथ लाभली.२०२१ साली सौ. स्मिता केतकर बाईंचे निधन झाले त्यानंतर त्यांच्या सुनबाई सौ. स्वरा केतकर यांनी शाळेचा पदभार सांभाळला.


शाळेचा प्रेरणादायी इतिहास
प्रिय पालक, विद्यार्थी आणि हितचिंतकांनो ,
मनोरम बालक मंदिर ही केवळ एक शाळा नसून , हे एक सुसंस्कार व मूल्यशिक्षण यांना जपणारे प्रेमळ शिक्षण मंदिर आहे.येथे आम्ही प्रत्येक बालकाच्या सर्वांगीण विकासाचा शिस्तबद्ध आणि आनंददायी पाया भरणी करण्याचे प्रयत्न करतो.
"सुसंस्कार हाच जीवनाचा आधार" या तत्त्वावर आमचा विश्वास असून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच आमच ध्येय आहे. आधुनिक तंत्रज्ञानासोबतच आमची शिक्षण पद्धती मूल्यशिक्षण, भाषिक कौशल्य, सृजनशीलता आणि आत्मविश्वास वाढवण्यावर भर देते. मी या संस्थेची मुख्याध्यापिका म्हणून शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांच्या मधील सुसंवाद, सहकार्य आणि स्नेहाचे वातावरण टिकवण्यासाठी नेहमी तत्पर असते. स्मिता केतकर बाईंकडून लाभलेली प्रेरणा आणि मार्गदर्शन आजही आमच्या कार्यात दिशादर्शक ठरते. आपल्या सर्वांच्या सहकार्याने ही शाळा अजूनही अधिक प्रेरणादायी आणि आधुनिकतेच्या दिशेने वाटचाल करत आहे.
सौ. जयश्री नाईक
मुख्याध्यापिका
मुख्याध्यापकांचा संदेश


आमचं शिक्षण – आनंददायी आणि गुणवत्तापूर्ण
मनोरम बालक मंदिर मध्ये आम्ही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर लक्ष केंद्रित करतो.
येथे बालवर्गापासूनच सेमी-इंग्रजी शिक्षण दिलं जातं, जेणेकरून विद्यार्थ्यांना सुरुवातीपासूनच इंग्रजी भाषेशी ओळख निर्माण होईल आणि भविष्यातील शिक्षण सुलभ होईल.
शिक्षण प्रक्रियेत अधिकाधिक शैक्षणिक साहित्यांचा वापर केला जातो – फ्लॅश कार्ड्स, चित्रफीती, शैक्षणिक खेळणी, अॅक्टिव्हिटी बुक्स आणि प्रात्यक्षिकांद्वारे शिक्षण देण्यात येतं. यामुळे मुलांचं शिकणं केवळ सोपं नव्हे, तर मनोरंजक आणि प्रभावी होतं.
शिक्षण आणि शिक्षण पद्धती
आमचं प्रमुख ध्येय म्हणजे
मुलांना आनंद देणारं शिक्षण देणं, त्यांचं कुतूहल जागृत करणं, आणि त्यांच्या मनात शाळेची गोड आठवण निर्माण करणं.
गंमतीशीर गोष्टी, कृतीतून शिकवण, खेळासोबत शिक्षण आणि आत्मविश्वास वाढवणाऱ्या उपक्रमांमुळे आमच्या शाळेत मुलं शिकताना हसतात, खेळतात आणि घडतात.
शाळेतील सुविधा
मनोरम बालक मंदिर ही शाळा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व मानसिक विकासासाठी आवश्यक असलेल्या सर्व सोयी-सुविधांनी सुसज्ज आहे. येथील वर्गखोल्या हवेशीर, स्वच्छ व प्रकाशमान आहेत – ज्या मुलांना शिकण्यासाठी अनुकूल आणि आरोग्यदायी वातावरण देतात. शाळेमध्ये शैक्षणिक साहित्याचा भरपूर साठा आहे. चित्रमय पुस्तकं, शैक्षणिक खेळणी, फ्लॅश कार्ड्स, आकृत्या, पझल्स आणि कृती साहित्य यांचा नियमित वापर केला जातो. यामुळे मुलांचे शिकणे अधिक प्रभावी व रंजक होते. खेळ हा शिक्षणाचाच भाग आहे, यावर आमचा ठाम विश्वास आहे. म्हणूनच मुलांसाठी छोटंसं पण आकर्षक ग्राउंड उपलब्ध असून, तिथे विविध खेळांची मजा आणि व्यायामाची सवय दोन्ही दिली जाते.
शिक्षकवर्ग
शाळेत प्रशिक्षित व प्रेमळ शिक्षकवर्ग कार्यरत आहे, जे प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देतात. मुलांचे मानसिक, सामाजिक व बौद्धिक विकास साधण्यासाठी हे शिक्षक आपली जबाबदारी मनापासून पार पाडतात.
प्रवेश प्रक्रिया
मनोरम बालक मंदिर मध्ये प्रवेश घेण्यासाठी खालील निकष आणि कागदपत्रांची आवश्यकता आहे:
प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे:
1. विद्यार्थ्याचा मूळ जन्म दाखला (Original Birth Certificate)
2. विद्यार्थ्याचा व दोन्ही पालकांचा आधार कार्ड झेरॉक्स
3. २ पासपोर्ट साईझ फोटो (विद्यार्थ्याचे)
4. फॉर्म फी – ₹100 (नॉन-रिफंडेबल)
वयाची अट (मे 2025 नुसार):
• नर्सरी (Nursery):
विद्यार्थीने 3 वर्षे पूर्ण केलेले असावेत
• ज्युनिअर केजी (Jr. KG):
विद्यार्थीने 4 वर्षे पूर्ण केलेले असावेत
• सिनिअर केजी (Sr. KG):
विद्यार्थीने 5 वर्षे पूर्ण केलेले असावेत
गैलरी
आमच्या विद्यालयांच्या उपक्रमांचा आणि यशांचा संग्रह
















पत्ता:
टी बिल्डिंग, काकडे पार्क, तानाजी नगर,
चिंचवड, पुणे - ४११०३३
कामकाजाची वेळ
सोमवार से शुक्रवार
10.00 ते 5.00
संपर्क
सामर्थ शिक्षण मंडळ
संपर्क करा
समर्पण
+91-9876543210
© 2025. All rights reserved.