समर्थ माध्यमिक विद्यालय

सुसंस्कार हाच जीवनाचा आधार या ध्येयाने प्रेरित होऊन पालक व शिक्षक यांच्या सहकार्यातून विद्यार्थ्यांवर सुसंस्कार उत्कृष्ट शिक्षण पद्धतीचा अवलंब करणे विविध शालेय उपक्रम राबविणे विद्यार्थ्यांमधील कला गुण ओळखून त्यांना मार्गदर्शन करणे सर्वांगीण विकास साधत संस्थेचे ध्येय साध्य करणे.

ध्येय:

मुलांवर सुसंस्कार करून देशासाठी सुशिक्षित, उच्चशिक्षित आणि सुसंस्कृत नागरिक तयार करणे.

"सुसंस्कार हाच जीवनाचा आधार" या ध्येयाने प्रेरित होऊन, पालक आणि शिक्षक यांच्या सहकार्यातून विद्यार्थ्यांवर सुसंस्कार घडविणे, उत्कृष्ट शिक्षणपद्धतीचा अवलंब करणे, विविध शालेय उपक्रम राबविणे, विद्यार्थ्यांमधील कला आणि गुण ओळखून त्यांना योग्य मार्गदर्शन करणे — यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधत संस्थेचे ध्येय साकार करणे.

धोरण:

स्थापना:

समर्थ शिक्षण मंडळाची स्थापना 1972 साली झाली. त्यानंतर 2003 साली प्राथमिक शाळेची आणि 2013 साली समर्थ माध्यमिक विद्यालयाची स्थापना करण्यात आली. 2015 साली इयत्ता दहावीची पहिली बॅच 100% निकालाने उत्तीर्ण झाली. त्यानंतर 2025 पर्यंत सलग अकरा वर्षे 100% निकालाची परंपरा समर्थ विद्यालयाने यशस्वीरित्या कायम राखली आहे

नमस्कार,

समर्थ माध्यमिक विद्यालयाच्या वेबसाईटवर आपले स्वागत.
वेबसाईटच्या माध्यमातून शाळेविषयी सर्व माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. शालेय शिक्षण हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील अतिशय महत्त्वाचा टप्पा असतो. विद्यार्थ्यांचे उत्तम व्यक्तिमत्व घडवण्यात शाळा महत्त्वाची भूमिका बजावत असते.

समर्थ विद्यालयामध्ये शालेय शिक्षणाबरोबरच उत्तम संस्कारही दिले जातात.
विविध सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे भारतीय संस्कृतीची ओळख करून दिली जाते. शाळेमध्ये अभ्यास, खेळ, परिपाठ, सांस्कृतिक कार्यक्रम या सर्व माध्यमातून विद्यार्थ्यांचे सर्वांगीण व्यक्तिमत्व घडवण्याचा प्रयत्न केला जातो. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, नियोजन कौशल्य, नेतृत्वगुण, सभाधीतपणा, नम्रता, आदर, सहिष्णुता इत्यादी गुणांचा विकास करण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. शाळेमध्ये विविध बाह्य स्पर्धा व परीक्षा आयोजित केल्या जातात. यामुळेच समर्थ विद्यालयाची ओळख पिंपरी-चिंचवडमधील एक नामांकित शाळा म्हणून झाली आहे. या शाळेशी आपण पालक म्हणून जोडले गेल्याबद्दल मला अत्यंत आनंद वाटतो.

शाळेच्या प्रगतीमध्ये विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांचा मोलाचा सहभाग असतो.
पालकांचे सहकार्य सदैव आम्हाला मिळत राहो आणि प्रगतीची उंच शिखरे आपण सर करत राहो, हीच मनापासून इच्छा व्यक्त करते.

सौ. प्रियंका एरंडे
मुख्याध्यापिका

मुख्याध्यापकांचा संदेश

white table with black chairs

अभ्यासक्रम

इयत्ता ६ वी ते १० वी साठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (SSC Board) यांचा शैक्षणिक अभ्यासक्रम राबवला जातो. या अभ्यासक्रमात खालील विषयांचा समावेश असतो:

  • प्रथम भाषा: मराठी

  • द्वितीय भाषा: हिंदी / संस्कृत

  • तृतीय भाषा: इंग्रजी

  • गणित

  • विज्ञान व तंत्रज्ञान

  • समाजशास्त्र (इतिहास व नागरिकशास्त्र, भूगोल)

  • चित्रकला, कार्यअनुभव, शारीरिक शिक्षण (खेळ)

विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे इयत्ता ८ वी ते १० वी पर्यंत संपूर्ण संस्कृत शिक्षण दिले जाते, जे शाळेची एक आगळी-वेगळी ओळख ठरते.

अध्यापन पद्धती

विद्यार्थ्यांचा वयोगट व समजशक्ती लक्षात घेऊन, शाळेमध्ये विद्यार्थी-केंद्रित आणि कृतीमूलक अध्यापन पद्धती राबवल्या जातात. या अध्यापन पद्धतींचा उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांचे केवळ पाठ्यपुस्तकातील ज्ञान वाढवणे नव्हे, तर त्यांच्या विचारशक्तीचा, सर्जनशीलतेचा आणि आकलनशक्तीचा विकास करणे.

प्रमुख अध्यापन पद्धती:

  • चर्चा पद्धत

  • गटकार्य

  • प्रकल्प आधारित शिक्षण

  • समस्या-समाधान तंत्र

  • व्याख्यान पद्धत

  • प्रश्नोत्तर व प्रात्यक्षिक पद्धत

  • नाट्यीकरण / भूमिकानाट्य

  • डिजिटल अध्यापन (Smart Classrooms)

  • शैक्षणिक साधनांचा प्रभावी वापर

या विविध पद्धतींमुळे विद्यार्थ्यांचा अभ्यासात रस वाढतो, आत्मविश्वास विकसित होतो आणि शिक्षण अधिक समजून घेण्याजोगं व उपयुक्त ठरते.

शिक्षक वृंद

समर्थ माध्यमिक विद्यालय हे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न आहे.
शाळेतील सर्व शिक्षक मंडळाने ठरवलेल्या शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता – पदवी, पदव्युत्तर व B.Ed. धारक आहेत.

  • विद्यार्थी संख्येनुसार पुरेशा वर्गखोल्या

  • सुसज्ज विज्ञान प्रयोगशाळा

  • संगणक कक्ष

  • ई-लर्निंग रूम

  • प्रत्येक वर्गात डिजिटल अध्यापनासाठी टीव्ही संच

सुविधा

  • मर्यादित विद्यार्थी संख्या

  • प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष

  • प्रशिक्षित व अनुभवी शिक्षक वर्ग

  • मूल्यशिक्षणावर विशेष भर

  • विद्यार्थी-केंद्रित अध्यापन पद्धती

  • विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

  • बाह्य स्पर्धा व परीक्षा सहभाग

  • नियमित परिपाठाचे नियोजन

  • विद्यार्थी समितीमार्फत शाळा व्यवस्थापनात सहभाग

  • विद्यार्थी, पालक व शिक्षक यांचे समुपदेशन सत्र

  • सहल, क्षेत्रभेटी व स्नेहसंमेलन यांचे आयोजन

  • नियमित पालक भेटीचे नियोजन

  • पालक-शिक्षक संघामार्फत पालकांचा सहभाग

  • विद्यार्थ्यांशी व पालकांशी सुसंवाद आणि सहकार्य

गैलरी

आमच्या विद्यालयांच्या उपक्रमांचा आणि यशांचा संग्रह

पत्ता:

एफ विंग, मोरया गोसावी राज पार्क, केशव नगर, चिंचवड, पुणे 33

कामकाजाची वेळ

सोमवार से शुक्रवार
10.00 ते 5.00

संपर्क
समर्थ माध्यमिक विद्यालय